top of page

Eye Donation of the Late Vijayabai Jawaharlal Deoda will help two corneal blinds to see the world

स्व. विजयाबाई जवाहरलाल देवडा यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मरणोत्तर नेत्रदान


संतोषी माता कॉलनी, कारंजा लाड येथील रहिवासी स्व.विजयाबाई जवाहरलाल देवडा यांचे ९ ऑगस्ट रोजी वयाच्या 79 व्या वर्षी दुःखद निधन झाले. निधनानंतर देवडा कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजुला सावरून त्यांचे पती श्री. जवाहरलाल देवडा, मुलगा श्री. पदम देवडा, श्री. प्रकाश देवडा, श्री. आनंद देवडा, यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यासाठी अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला शितल देवडा यांनी संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

देवडा कुटुंबीयांनी स्व. विजयाबाई जवाहरलाल देवडा यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
देवडा कुटुंबीयांनी स्व. विजयाबाई जवाहरलाल देवडा यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ अजय कांत, डॉ शार्दूल डोंणगावकर, डॉ पंकज काटोले, डॉ राम गुंजाटे, डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, प्राचार्य श्रीनिवास जोशी, श्री. आशिष बंड, श्री. परमेश्वर व्यवहारे, श्री. प्रफुल्ल वानखडे, श्री. मनोहर बरडीया, श्री. मनीष साबू, श्री. अशोक ईनानी, उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी देवडा परिवारातील श्री. महावीरचंद, श्री. मदनचंद, श्री. सुगनचंद व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी देवडा कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व. विजयाबाई जवाहरलाल देवडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

नेत्रदाता स्व. विजयाबाई जवाहरलाल देवडा
नेत्रदाता स्व. विजयाबाई जवाहरलाल देवडा

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.


मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक, अंबापेठ अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.

Comments


bottom of page