top of page

Eyes that Empower: Gahankari Guruji's Gift of Vision through Deesha International Eye Bank

कारंजा (लाड) येथील रहिवासी स्व. श्री. माणिकचंद केशरीचंद गहाणकरी यांचे दिनांक ७ जुन २०२३ रोजी दुःखद निधन झाले. दिशा परिवाराचे कारंजाचे सदस्य श्री संजीव रुईवाले यांनी गहाणकरी परिवाराला नेत्रदान विषयी माहिती दिली. थोडा ही वेळ न घालवता गहाणकरी परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सावरून अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. माणिकचंद केशरीचंद गहाणकरी यांचा नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला.

Deesha International Eye Bank Amravati donating the eyes of Gahankari Guruji
Gahankari Family donating eyes in Deesha International Eye Bank

दिशा इंटेरनॅशनल आय बँकेचे श्री हिमांशू बंड, सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी दिशा ग्रुप कारंजा चे डॉ शार्दुल डोणगावकर, डॉ राम गुंजाटे, डॉ विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, डॉ उल्हास काटोले, श्री समीर जोहरापूरकर, श्री भारत हरसूले, श्री प्रसन्न आग्रेकर, श्री सुदर्शन दर्यापूरकर, श्री प्रज्वल गुलालकरी हे उपस्थित होते. नेत्रदान पूर्वीच्या कोविड चाचणी करिता कारंजा उपजिल्हा रुग्णालय टीम चे सहकार्य मिळाले.


या सेवाभावी कार्यात परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांतर्फे गहाणकरी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले व स्व.श्री माणिकचंद केशरीचंद गहाणकरी यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.


आपण देखील परिजनांच्या नेत्रदानासाठी पुढाकार घेऊ शकता व दोन दृष्टी बाधित व्यक्तींना दृष्टी देऊ शकता. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्तमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला 8275539754 किंवा 7378656145 वर संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे.

510 views0 comments

Commenti


bottom of page