दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा कवठा बहाळे मध्ये १०६ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा उपलब्ध करून देण्याकरिता फिरते नेत्र चिकित्सालय काम करत आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा अमरावती जिल्हा मधील भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या कवठ बहाळे या गावात जेष्ठ नागरिक व मुलांचे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा जोतीबा फुले महाविद्यालय द्वारा या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली या मध्ये पुरुष, महिला, मुले याची मोफत नेत्रतपासणी करून देण्यात अली. मोबाईल वाढलेल्या वापरामुळे तरुणांमध्ये नव्याने आढळणारा डोळ्यांचा कोरडेपणा (ड्राय आय) याचे सुद्धा रुग्ण आढळले. त्यासाठी त्यांना आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी जोग्या मार्ग दर्शन करण्यात आले. जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदूच्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. कॉर्नियल ऑपॅसिटी असलेला व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आला. अश्या प्रकारचे अंधत्व्य दूर करण्या साठी एकमेव मार्ग असतो. नेत्रदान झालेला पारदर्शक कॉर्निया हा त्या व्यक्तीला प्रत्यारोपण द्यारा बसवल्या जाऊन त्या व्यक्तीची दुष्टी वाचवल्या जाऊ शकते. यातील काही रुग्णांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत महात्मा जोतीबा फुले महाविद्यालय च्या प्राचार्य डॉ. मीनल भोंडे (ठाकरे), डॉ सुशांत ठोके, प्रा. विद्या अंभोरे, कु. सलोनी कळसकर, श्री आकाश जोंधळेंजार व तसेच दिशा ग्रुपचे श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद, श्री हिमांशू बंड आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मारनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक, चैतन्य कॉलोनी, जुना बायपास रोड, अमरावती मो. 9899898667, 8275539754, 7378656145
Comments