दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा नवरात्रोत्सव दरम्यान नेत्र तपासणी शिबिरा मध्ये ११९ नागरिकांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा वाशीम जिल्हा कारंजा (लाड) येथे नवरात्रोत्सवचे अवचित्त साधून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या साठी जय बजरंग मित्र मंडळ व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन अमरावती द्वारे नेत्र रुग्ण तपासणी शिबिर या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक, मुले व गरजुंची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ११९ नागरिकांची तपासणी करण्यात आली या मध्ये ५० जेष्ठ नागरिक, लहान मुले व तरुणाचा याची मोफत नेत्रतपासणी करून देण्यात अली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. त्याच बरोबर तरुण मुले आपले डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी जोग्या मार्ग दर्शन करण्यात आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.
या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीता जय बजरंग मित्र मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य व इतर सहकारी मित्र मंडळींनी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री हिमांशू बंड, श्रीमती भारती तसरे, श्री मोहम्मद नावेद आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Comments