top of page

Late Deepak Khemwani gives the gift of sight to two people

स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

 

सिंधी कॉलनी, कारंजा लाड, येथील रहिवासी स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी ०३ सप्टेंबर रोजी ह्रदय विकाराचा झटक्याने दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. खेमवाणी परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने खेमवाणी परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

खेमवाणी कुटुंबीयांनी स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
खेमवाणी कुटुंबीयांनी स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मार्गदर्शक डॉ. विजय जवाहरमलानी, श्री. प्रज्वल गुलालकरी व खेमवाणी परिवारातील श्री. राहुल खेमवाणी, श्री. अनिल खेमवाणी, श्री. मनिष प्रेमचंदाणी व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी खेमवाणी कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

नेत्रदाता स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी
नेत्रदाता स्व. श्री. दीपक रमेशलाल खेमवाणी

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

Comments


bottom of page