top of page
Admin

Late Shri Ramkrishna Patankar helped two corneal blinds to see this world.

Updated: Jan 14, 2023

स्व. श्री रामकृष्ण केशवराव पाटणकर यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

दोन बुबुळामुळे दृष्टी बाधित व्यक्तीनं मिळणार दृष्टी


लोकमान्य कॉलनी, अमरावती येथील रहिवासी स्व श्री रामकृष्ण केशवराव पाटणकर यांचे दुःखद निधन झाले. स्व. श्री रामकृष्ण केशवराव पाटणकर यांची ईच्छा होती कि त्यांचे मरणोपरांतनेत्रदान व्हावे. त्यांच्या या इच्छेचा मान ठेवत पाटणकर परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सावरून अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने पाटणकर परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री रामकृष्ण केशवराव पाटणकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्या करता त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री शुभम सुनील खंडारे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे पाटणकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. पाटणकर परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सोबत नेत्र प्रत्यारोपण केंद्र श्री गणपती नेत्रालयचे देखील पत्र देखील देण्यात आले. या सेवाभावी कार्यात पाटणकर परिवारातिल डॉ. क्षितिज पाटणकर, श्रीमती श्वेता लिखितकर, श्रीमती तेजस्विनी देशमुख व पाटणकर परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व श्री रामकृष्ण केशवराव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.


भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे. मारनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.




50 views0 comments

Commentaires


bottom of page