Visually impaired children from Amravati made a noble decision to donate their father’s eyes at Deesha International Eye Bank, giving hope and light to many lives
- anildeshmukh
- May 8
- 2 min read
अमरावती येथील जन्मतः अंध असलेल्या मुलांनी आपल्या वडिलांचे
दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान केले
गीतांजली हाऊसिंग सोसायटी, अमरावती येथील रहिवासी स्व. श्री. दुर्गादास दत्तात्रय मुळे यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. मुळे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत मुळे परिवाराने स्व. श्री. दुर्गादास दत्तात्रय मुळे यांचे मुले श्री. विजय मुळे, श्री. संजय मुळे हे जन्मताच दृष्टीबाधित असून, स्वतःला कधीच जग पाहता आले नाही, तरीही इतर दोन दृष्टीबाधित व्यक्तींना प्रकाश मिळावा, या उदात्त भावनेतून त्यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, डॉ. श्रद्धा ढाकुलकर, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे द्वारे मुळे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. मुळे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात सौ. सविता जोशी, सौ. कमल मुळे, सौ. विना मुळे तसेच मुळे परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. दुर्गादास दत्तात्रय मुळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 7378656145 । 7378656144 । 9899898667





Comments