top of page

Nandgaonkar family donated their 44-year-old son's eye to Deesha International Eye Bank

स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर यांचे  दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

 

चवरे लाईन, कारंजा येथील रहिवासी स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी २७ मार्च रोजी ह्रदय विकाराचा झटक्याने दुःखद निधन झाले. निधनानंतर नांदगावकर कुटुंबाने आपल्यावरील दुखाचा डोंगर बाजुला सारून त्यांचे वडील श्री अविनाश नांदगावकर, पत्नी मुग्धा व पुत्र तनय, भाऊ श्री अतुल नांदगावकर, श्री संजीव नांदगावकर, श्री अनुप नांदगावकर, श्री शशिकांत नांदगावकर, श्री अविन नांदगावकर यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला श्री सुधीर देशपांडे यांनी संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


नांदगावकर कुटुंबीयांनी स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
नांदगावकर कुटुंबीयांनी स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ संजय किटे, डॉ अजय कांत, डॉ शार्दुल डोंणगावकर,डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, डॉ.उल्हास काटोले, डॉ मनीष राऊत, डॉ अमोल उगले, प्रा. राजा गोरे, श्री समीर देशपांडे, श्री आशिष तांबोळकर, श्री प्रफुल्ल वानखडे, श्री सुदर्शन दर्यापूरकर, श्री ओजस बंड, श्री प्रांजल दर्यापूरकर, श्री अनुप परळीकर, श्री प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी नांदगावकर कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.


नेत्रदाता स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर
नेत्रदाता स्व. श्री तेजस अविनाश नांदगावकर

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

Comments


bottom of page