top of page

A Lasting Gift of Sight: Posthumous Eye Donation of Late Former MLA Prof. Bhaurao Tulshiram Deshmukh to Deesha International Eye Bank, Amravati

 

माजी आमदार स्व. प्रा. भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे मरणोत्तर दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान “हे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे”

 

अमरावती येशील रहिवासी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे, ज्येष्ठ शिक्षक नेते, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत तथा माजी आमदार स्व. प्रा. भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. देशमुख परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्तितीत श्री. विलास मराठे यांनी त्यांच्या मुलीला नेत्रदान करण्यास प्रेरित केले त्यानंतर मुलगी डॉ. वैशाली वानखडे यांनी आपले वडील  स्व. प्रा. भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ अंकित हरवानी, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

 

Deshmukh Family donated the eyes of Late Bhaurao Tulshiram Deshmukh in DEF's Deesha International Eye Bank
Deshmukh Family donated the eyes of Late Bhaurao Tulshiram Deshmukh in DEF's Deesha International Eye Bank

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे द्वारे देशमुख कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. देशमुख परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात देशमुख परिवारातील डॉ. वैशाली वानखडे, डॉ. अतुल जैन, डॉ. रविंद्र वाघमारे, डॉ. निलेश इंगळे तसेच परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. प्रा. भाऊराव तुळशीराम देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Late Bhaurao Deshmu
Late Bhaurao Deshmu

 

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.

 

मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.

 

नेत्रदानासाठी संपर्क: 7378656145। 7378656144 । 9899898667

 

Comments


bottom of page