top of page

Thanks to the eye donation from the late Shri Vinayak Gopalrao Barbade, two blind individuals will regain sight.

anildeshmukh
Oct 10
1 min read

स्व. श्री. विनायक गोपाळराव बारब्दे

यांच्या नेत्रदानातून मिळणार दोन अंध वेक्तीना नवीन दृष्टी


मुरलीधर नगर, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. विनायक गोपाळराव बारब्दे यांचे दुःखद निधन झाले. बारब्दे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत मुलगा श्री. उमेश बारब्दे यांनी आपले वडील स्व. श्री. विनायक गोपाळराव बारब्दे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Barabdhe Family donated the eyes of Late Vinayak Gopalrao Barabdhe in Deesha International Eye Bank, Amravati
Barabdhe Family donated the eyes of Late Vinayak Gopalrao Barabdhe in Deesha International Eye Bank, Amravati

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे बारब्दे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. बारब्दे परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात बारब्दे परिवारातील श्री. सुनील ताथोड, सौ. प्रांजली डांगोरे तसेच बारब्दे परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. विनायक गोपाळराव बारब्दे यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Late Vinayak Barabdhe
Late Vinayak Barabdhe

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.


नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page