top of page
Writer's pictureHimanshu Band

The Inspiring Story of the Bhoyar Family: How Eye Donation Helped Others See the World

स्व. श्री गोपाल विठ्ठलराव भोयर यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

यांनी नेत्रदान केल्यामुळे दृष्टी हिन वेक्तींना मिळणार दृष्टी


कारंजा (लाड), वाशीम येशील रहिवासी स्व. श्री गोपाल विठ्ठलराव भोयर याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. भोयर परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने भोयर परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री गोपाल विठ्ठलराव भोयर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

Bhoyar Family member handed over the eye donation box to Deesha International Eye Bank
Bhoyar Family member handed over the eye donation box to Deesha International Eye Bank

यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी दिशा ग्रुप कारंजा चे डॉ पंकज काटोले, डॉ विजय डोणगावकर, डॉ अजय कांत, डॉ नवल सारडा, डॉ उल्हास काटोले, शेखरजी बंग, आशिष बंड, श्याम सवई, नीतीन शार्दूल कश्यप, रमेश देशमुख, श्री प्रज्वल गुलालकरी हे उपस्थित होते.

स्व.श्री. गोपाल विठ्ठलराव भोयर यांचे मरणोत्तर नेत्रदान
स्व.श्री. गोपाल विठ्ठलराव भोयर यांचे मरणोत्तर नेत्रदान

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे कांबळे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. भोयर परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात भोयर परिवारातिल श्रीमती पीयुषा गोपाल भोयर, श्री रमेशजी काटोले व श्री उमेश भोयर व भोयर परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री गोपाल विठ्ठलराव भोयर यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.






Comments


bottom of page