The Inspiring Story of the Bhore Family: How Eye Donation Helped Others See the World
- anildeshmukh
- Aug 19, 2024
- 2 min read
स्व. श्रीमती अरूणाबाई धन्यकुमार भोरे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
गुरु मंदिर, संस्थान जवळील, कारंजा लाड येथील रहिवासी स्व. श्रीमती अरूणाबाई धन्यकुमार भोरे यांचे १८ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. निधनानंतर भोरे कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजुला सावरून त्यांचे मुले श्री. भरत भोरे, श्री. बाहुबली भोरे, श्री. विवेक भोरे यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यासाठी अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला डॉ. शार्दूल डोंणगावकर, श्री. संजीव रुईवाले यांनी संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ. विजय जवाहरमलानी, राजेंद्र खंडारे, प्राचार्य उदय नांदगावकर , प्रकाश सरोदे, हेमंत चवरे, सुदर्शन दर्यापुरकर, विवेक गहाणकरी, प्रज्वल गुलालकरी, पवन उखळकर, विकास भोरे व परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी भोरे परिवारातील कीर्ती भोरे, सन्मती भोरे, अभिनंदन भोरे, सुनंदाताई मुधोळकर, वीणाताई मुधोळकर, व पंडिता विजयाताई भिसिकर व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी भोरे कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व. श्रीमती अरूणाबाई धन्यकुमार भोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक, अंबापेठ अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.
コメント