top of page

The Inspiring Story of the Daryapurkar Family: How Eye Donation Helped Others See the World

मा. प्राचार्य स्व. श्री. विनोद अभयकुमार दर्यापूरकर यांचे मरणोत्तर

दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान


कारंजा लाड, वाशिम येशील रहिवासी मा. प्राचार्य स्व. श्री. विनोद अभयकुमार दर्यापूरकर यांचे दुःखद निधन झाले. दर्यापूरकर परिवारावर दुःखाचा डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत मुलगी सौ. संपदा रुईवाले यांनी आपले वडील स्व. श्री. विनोद अभयकुमार दर्यापूरकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ अंकित हरवानी, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Daryapurkar Family donated the eyes of Late Vinod Abhaykumar Daryapurkar in Deesha International Eye Bank, Amravati
Daryapurkar Family donated the eyes of Late Vinod Abhaykumar Daryapurkar in Deesha International Eye Bank, Amravati

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे दर्यापूरकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. दर्यापूरकर परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात दर्यापूरकर परिवारातील श्री. परेश दर्यापूरकर, श्री. मिथिल दर्यापूरकर, श्रीकांत दर्यापूरकर, जयंत दर्यापूरकर, नयन दर्यापूरकर, संदीप दर्यापूरकर तसेच यावेळी दिशा ग्रुपचे डॉ. राम गुंजाटे, डॉ. प्रेशित पिंपळे, डॉ. उल्हास काटोले, डॉ. दिलीप खेमवाणी, डॉ. विजय जवाहरमलानी, नितीन नागवाणी, प्रज्वल गुलालकरी व परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. विनोद अभयकुमार दर्यापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

Late Vinod A. Daryapurkar
Late Vinod A. Daryapurkar

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.

 

मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.

 

नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

 

Comments


bottom of page