top of page

राज्यसभा खासदार मा.डॉ. अनिल बोंडे यांनी ठेवले समाज समोर आणखी एक आदर्श.

खासदार मा. श्री. अनिल बोंडे यांनी आपले वडील स्व.श्री. सुखदेवराव बोंडे यांचे मरणोत्तर दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान केले. दोन बुबुळामुळे दृष्टी बाधित व्यक्तीनं मिळणार दृष्टी


राज्यसभा खासदार मा.डॉ. अनिल बोंडे यांचे वडील स्व.श्री. सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांना शनिवार दिनांक ३ फेबुवारी रोजी देवाज्ञा झाली. मृतुप्रंत डॉ श्रद्धा ढाकुलकर व श्री हिमांशू बंड यांनी बोंडे परिवाराला नेत्रदान माहिती देऊन प्रेरित केले. डॉ अनिल बोंडे, डॉ वसुधा बोंडे, सौ संगीत शिंदे व बोंडे परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सावरून अशाही परिस्तिथीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने स्व.श्री. सुखदेवराव बोंडे यांचा नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती मधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

मा. श्री. अनिल बोंडे व बोंडे कुटुंबीयांनी स्व. श्री सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.
मा. श्री. अनिल बोंडे व बोंडे कुटुंबीयांनी स्व. श्री सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांचे नेत्रकलम दिशा इंटरनॅशनल आय बँकेला सुपूर्त केले.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे बोंडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. बोंडे परीवाला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात बोंडे परिवारातिल डॉ अनिल बोंडे, डॉ वसुधा बोंडे, श्री नितीन गुडधे, सौ संगीत शिंदे व बोंडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व.श्री. सुखदेवरावजी बोंडे यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.


स्व.श्री. सुखदेवराव रामभाऊ बोंडे
स्व.श्री. सुखदेवराव रामभाऊ बोंडे

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे. मरनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org.



bottom of page