top of page

A Legacy of Compassion: Eye Donation of Late Shree Prabhakar Motilal Mahajan in Deesha International Eye Bank, Amravati

  • anildeshmukh
  • Jul 23
  • 1 min read

दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये

स्व. श्री. प्रभाकर मोतीलाल महाजन यांचे नेत्रदान


अंजनगाव सुर्जी, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. प्रभाकर मोतीलाल महाजन यांचे दुःखद निधन झाले. महाजन परिवारावर दुःखाचा डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत मुलगी सौ. प्रिया देवलसी यांनी आपले वडील स्व. श्री. प्रभाकर मोतीलाल महाजन यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ अंकित हरवानी, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Mahajan Family donated the eyes of Late Shree Prabhakar Motilal Mahajan in Deesha International Eye Bank, Amravati
Mahajan Family donated the eyes of Late Shree Prabhakar Motilal Mahajan in Deesha International Eye Bank, Amravati

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे महाजन कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. महाजन परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात महाजन परिवारातील श्री. स्वप्नील देवलसी, श्री. राकेश महाजन, श्री. सोहण जिंतूरकर तसेच परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. प्रभाकर मोतीलाल महाजन यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Late Prabhakar Mahajan
Late Prabhakar Mahajan

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.



नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page