top of page

At Deesha International Eye Bank Amravati, three families have entrusted the gift of sight from their loved ones—donating a total of six eyes.

anildeshmukh
Nov 21
2 min read

दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावतीमध्ये

०३ तासात ०३ नेत्रदान


अमरावती येशील दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये एका दिवसात तीन नेत्रदान झाले. स्व.श्री. साजनदास जिवतराम जवाहरमलानी, स्व.श्री. गोपालसंगई बापूसंगई हरसूले व स्व.श्री. रुपगीर महादेवगिर गिरी यांचे दुःखद निधन झाले. तिन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत परिवारातील सदस्यांनी स्व.श्री. साजनदास जिवतराम जवाहरमलानी, स्व.श्री. गोपालसंगई बापूसंगई हरसूले व स्व.श्री. रुपगीर महादेवगिर गिरी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Jawaharmalani Family donated the eyes of Late Sajandas Jivatram Jawaharmalani in Deesha International Eye Bank, Amravati
Jawaharmalani Family donated the eyes of Late Sajandas Jivatram Jawaharmalani in Deesha International Eye Bank, Amravati

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे जवाहरमलानी, हरसूले व गिरी कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. जवाहरमलानी, हरसूले व गिरी परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात जवाहरमलानी परिवारातील श्री. सच्चयानंद जवाहरमलानी, श्री. सुनील जवाहरमलानी, श्री. शंकर जवाहरमलानी तसेच हरसूले परिवारातील श्री. भारत हरसुले, श्री. विवेक गहाणकरी, श्री. पपिश कहाते व गिरी परिवारातील श्री. संजय गिरी, श्री. अनिल गवारे, श्री. सुनील गिरी तसेच इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व.श्री. साजनदास जिवतराम जवाहरमलानी, स्व.श्री. गोपालसंगई बापूसंगई हरसूले व स्व.श्री. रुपगीर महादेवगिर गिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली.


भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.

नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Harsule Family donated the eyes of Late Gopalsanghi Bapusanghi Harsule in Deesha International Eye Bank, Amravati
Harsule Family donated the eyes of Late Gopalsanghi Bapusanghi Harsule in Deesha International Eye Bank, Amravati
Giri Family donated the eyes of Late Rupgir Mahadeogir Giri in Deesha International Eye Bank, Amravati
Giri Family donated the eyes of Late Rupgir Mahadeogir Giri in Deesha International Eye Bank, Amravati

Comments


bottom of page