ग्रामीण भागातील नेत्रसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल
- Pranali Chambhare
- Jul 14
- 2 min read
भातकुली येथे दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालयाद्वारे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये ८० नागरिकांनी नेत्रसेवेचा लाभ घेतला.
दि. १२ जुलै २०२६
गावागावांत दर्जेदार नेत्रसेवा
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना वेळेवर नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत नाही. ही दरी कमी करण्यासाठी दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालयाद्वारे सातत्याने ग्रामीण भागात मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
याच उपक्रमांतर्गत दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री आदिनाथ स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, भातकुली, जि. अमरावती येथे अमरावती दिगंबर जैन बघेरवाल समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ८० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उदघाटन
या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. अक्षय मांडवे, तहसीलदार, भातकुली यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिबिरातील सुविधा
शिबिरामध्ये नागरिकांची दृष्टी तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणे तसेच विविध नेत्रविकारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी धर्मादाय नेत्र रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
नेत्रदान जनजागृती फलकासह महिलांचा पाठिंबा नेत्रदान जनजागृती फलकासह पुरुषांचा पाठिंबा अमरावती दिगंबर जैन बघेरवाल समाज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजक
यशस्वी आयोजनामागील सहकार्य
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमरावती दिगंबर जैन बघेरवाल समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेश कळमकर, सचिव श्री. आदेश देवलसी, उपाध्यक्ष श्री. कुशल दर्यापूरकर, सहसचिव श्री. निखिल भोंगाडे, सहसचिव श्री. संकेत पेंढरी, सदस्य श्री. रोहन देवलसी सदस्य तसेच आमंत्रित सदस्य श्री. संजय दर्यापूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. .
दिशा ग्रुपचे संस्थापक श्री. स्वप्नील अरुण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नेत्रतज्ज्ञ प्रणाली चांभरे, नेत्रपेढी तंत्रज्ञ श्री. हिमांशू बांड व श्री. अनिल देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांची नेत्र तपासणी व मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा ग्रुपच्या नेत्रसेवा पथकाने मोलाचे सहकार्य केले.
Mobile eye care unit at bhatkuli During Eye Checkup Camp अमरावती दिगंबर जैन बघेरवाल समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित नेत्र तपासणी शिबीर
नेत्रदान जनजागृती
शिबिरामध्ये नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व, नियमित नेत्र तपासणी आणि डोळ्यांची योग्य काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इच्छुक नागरिकांना नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.

आरोग्यदायी समाजकडे वाटचाल
ग्रामीण व उपेक्षित भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार, सुलभ आणि परवडणारी नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने दिशा ग्रुपचे फिरते नेत्र चिकित्सालय सातत्याने कार्यरत आहे. अशा उपक्रमांमधून केवळ नेत्र तपासणीच नव्हे, तर नेत्र आरोग्य आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नेत्रदानासाठी व नेत्र तपासणी शिबीर आयोजनासाठी संपर्क 9899898667 | 7378656145




Comments