top of page

Bringing Vision Care to Remote Areas: Deesha Mobile Eye Care Unit Conducted Eye Check-up Camp at Ghatladki

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा घाटलाडकी येथे १३२ नागरिकांची नेत्र तपासणी


Deesha's Mobile Eye Care Unit at Ghatladki
Deesha's Mobile Eye Care Unit at Ghatladki

दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे अमरावती जिल्ह्यातील धाटलाडकी या गावातील श्री. विनायक देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराव विद्यालय येथे १९ डिसेंबर २०२६ रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक व मुलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.


Snapshot's from Eye Check-up Camp
Snapshot's from Eye Check-up Camp

या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी श्री. विनायक देशमुख, श्री. विलास काळे तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

नियमित नेत्र तपासल्यामुळे नेत्रसंबंधी अनेक आजारांचे योग्य वेळेत निदान होऊ शकते. त्यामुळे अशा अनेक आजारांचे निदान करून व योग्य उपचार वेळेत रुग्णाला प्राप्त झाल्यास अनेक रुग्णांची दृष्टी जाण्यापासून आपण वाचवू शकतो. याच उद्देशाला लक्षात घेऊन दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकित्सालय उपलब्ध करून देत आहे.


Bringing Eye Care Closer to People
Bringing Eye Care Closer to People

Comments


bottom of page