top of page

Deesha Group's Mobile Eye Care Unit Conducted an Eye Checkup in Amla, Daryapur

anildeshmukh
Dec 9, 2024
1 min read

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा

आमला, तालुका दर्यापूर मध्ये १३१ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

 

दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सालय मध्ये दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी आमला येथे गाडगे बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये स्व.अण्णाजी बाबुरावजी वानखडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.


आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळासाहेब वानखडे, संस्थेचे सचिव श्री. शुभम वानखडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेश देशमुख व सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, ऑप्थल्मिक ऑफिसर कु. प्रणाली चांभारे, श्रीमती भारती तसरे, श्री. अनिल देशमुख, श्री. हिमांशू बंड आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Comments


bottom of page