Deesha International Eye Bank: Two Eye Donations in Two Days
दोन दिवसात अमरावती मध्ये दोन नेत्रदान
दोन परिवाराने सोपवले दिशा इंटरनॅशनल आय बँक कडे आपल्या परिजनांचे नेत्रकमल
अमरावती जिल्हा येथील रहिवासी स्व. श्री. विठ्ठल दशरथजी देशभ्रतार व स्व. श्री. गंगाबिसन रामबीलास जाजू याचे नुकतेच दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. दोन्ही परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळला परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने देशभ्रतार परिवार व जाजू परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. विठ्ठल दशरथजी देशभ्रतार व स्व. श्री. गंगाबिसन रामबीलास जाजू यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा एजुकेशन फाउडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ मनिष बबन तोटे, डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित हारवणी, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्ष सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे देशभ्रतार व जाजू कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. देशभ्रतार व जाजू परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात देशभ्रतार परिवाराचे श्री. अविनाश देशभ्रतार, श्री. सुमित फेटे, श्री. तेजस पंचभाई व जाजू परिवाराचे श्री. संजय जाजू, डॉ. दिपक कावरा, श्री. गिरीश चांडक व दोन्ही परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. विठ्ठल दशरथजी देशभ्रतार व स्व. श्री. गंगाबिसन रामबीलास जाजू यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.

भारतासमोर अंधत्वाची एक मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामोळे दोन कोर्नेअल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा तासान पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामोळे मृत्यू नंतर ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. मारनोतर नेत्रदानासाठी संपर्क करा दिशा इंटरनॅशनल आय बँक,यशोदा नगर अमरावती. मो. 9899898667, 8275539754, 7378656145 किवा स्वप्नील अरुण गावंडे - 9423424450. ऑनलाईन नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी भेट द्या www.deeshagroup.org





Comments