top of page
anildeshmukh

Eye examination of 135 citizens by Deesha Group Mobile Eye Care Unit at Badnera, Amravati

बडनेरा, अमरावती येथे दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा

१३५ नागरीकांची नेत्र तपासणी मध्ये ७८% नागरीकांची अपवर्तक दृष्टी…


दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून दिली आहे. या फिरत्या नेत्र चिकिसालय द्वारा श्री शंकर मारोती मंदिर, बडनेरा येथे १३५ नागरीकांची नेत्र तपासणी करण्यात आली,. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिक, महिला, मुलांचे व गरजुंची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

People undergoing an eye checkup in Mobile Eye Care Unit
People undergoing an eye checkup in Mobile Eye Care Unit

या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो या साठी मार्गदर्शन करण्यात आले. बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू आजार आढळून आले. जेष्ठाना असलेल्या मोतियाबिंदू च्या ऑपरेशन संबधी समुपदेशन करण्यात आले. या सोबतच कॉर्नियल ऑपॅसिटी असलेला व्यक्ती सुद्धा या शिबिरा मध्ये आढळून आले. यातील काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.

या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करीत श्री कैलश जोशी तसेच दिशा ग्रुपचे श्री स्वप्नील अरुण गावंडे, श्री

हिमांशू बंड, श्री अनिल देशमुख, श्री मोहम्मद नावेद, श्रीमती भारती तसरे, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.




Comments


bottom of page