Deesha Mobile Eye Care Unit Conducts Eye Check-up Camp at Vitthalwadi Bhavan, Washim
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा विठ्ठलवाडी येथे ९४ नागरिकांची नेत्र तपासणी

दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकिसालय द्वारा वाशीम जिल्हा मधील विठ्ठलवाडी भवन येथील श्री. प्रदीप देशमुख यांच्या वाढदिवसानीमीत्त २० फेब्रुवारी २०२६ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण ९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये बहुतांश जेष्ठ नागरिकांच्या नेत्र तपासणी मध्ये मोतियाबिंदू व टेरेजियम आजार आढळून आले. या सर्वांना पुढील तपासणी साठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे.
या शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगितले. भारतात अंधत्व ही मोठी समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ही महत्त्वाची माहिती नागरिकांना देण्यात आली. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच चष्मा वापरणाऱ्या आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही दान करता येतात.

या नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजणा मध्ये श्री. प्रदीप देशमुख, तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
नियमित नेत्र तपासल्यामुळे नेत्र संबधी अनेक आजाराचे योग्य वेळेत निदान होऊ शकते. त्यामुळे अश्या अनेक आजाराचे निदान करून व योग्य उपचारा वेळेत रुग्णाला प्राप्त झाला तर अश्या अनेक रुग्णाची दृष्टी जाण्यापासून आपण वाचवू शकतो. याच उद्देशाला लक्षात घेऊन दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारा ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे उपलब्ध करून देत आहे.




Comments