स्व.श्री. मुकुंद गजानन कुलथे यांचे मरणोत्तर नेत्रदान
वाशिम जिल्हा येथील कारंजा लाड तालुकयातील रहिवासी मुकुंद गजानन कुलथे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी ६ जुलै रोजी निधन झाले. निधनानंतर कुलथे कुटुंबाने आपल्यावरील दुखाचा डोंगर बाजुला सारून त्यांची पत्नी रेणुका मुकुंद कुलथे व मुलगा निलेश कुलथे यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला.
अमरावतीमधील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशू बंड व सचिव स्वप्निल गावंडे, अनिल देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ. सुशील देशपांडे, डॉ विवेक घुडे, प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते
नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी कुलथे कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व.मुकुंद गजानन कुलथे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमाअसे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.
Kommentare