Late Saraswati Nagwani gives the gift of sight to two people
- anildeshmukh
- Oct 9, 2023
- 1 min read
दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान
दोन बुबुळांमुळे दोन दृष्टी हिन वेक्तींना बघता येणार हे सुंदर जग…
सिंधी कॅम्प, कारंजा लाड, वाशिम येशील रहिवासी स्व. श्रीमती सरस्वती झम्मटमल नागवाणी याचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. नागवाणी परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने नागवाणी परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती सरस्वती झम्मटमल नागवाणी यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्यानी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ मनिष बबन तोटे, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरोणत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे नागवाणी कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. नागवाणी परीवाला नेत्रदाना केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत

नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात श्री दयालदास नागवाणी, श्री नितीन नागवाणी, श्री सचिंद्र राघवाणी व नागवाणी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडलाने व कार्यकर्त्यांतर्फे स्व. सरस्वती झम्मटमल नागवाणी यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली.
Comments