top of page

Bhagat Family donated the eyes of Late Vimal Arvind Bhagat in Deesha International Eye Bank, Amravati

anildeshmukh
Aug 18
1 min read

माजी. तहसीलदार श्री. अरविंद भगत यांनी आपली पत्नी स्व. श्रीमती विमल अरविंद भगत यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये केले नेत्रदान


पोलीस कॉलनी, अर्जुन नगर, अमरावती येशील रहिवासी स्व. श्रीमती विमल अरविंद भगत यांचे दुःखद निधन झाले. भगत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत पती श्री. अरविंद भगत यांनी आपली पत्नी स्व. श्रीमती विमल अरविंद भगत यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Late Vimal Bhagat
Late Vimal Bhagat

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे भगत कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. भगत परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात भगत परिवारातील पती श्री. अरविंद भगत, मुलगा श्री. तुषार भगत, श्री. वैभव भगत तसेच भगत परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्रीमती विमल अरविंद भगत यांना श्रद्धांजली अर्पण केली


भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.


नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page