Mule Family donated the eyes of Late Vidhya Satishrao Mule in DEF's Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्रीमती विद्या सतीशराव मुळे
यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान
राजहिल, जुना बाय पास, अमरावती येशील रहिवासी स्व. श्रीमती विद्या सतीशराव मुळे यांचे दुःखद निधन झाले. मुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत मुलगा श्री. योगेश मुळे यांनी आपली आई स्व. श्रीमती विद्या सतीशराव मुळे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे मुळे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. मुळे परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात मुळे परिवारातील मुलगा श्री. योगेश मुळे, श्री. महेश मुळे, श्री. वैभव कोकाटे तसेच मुळे परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्रीमती विद्या सतीशराव मुळे यांना श्रद्धांजली अर्पण केली
भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145




Comments