top of page

Paturkar Family donated the eyes of Late Vidhya Prakash Paturkar in Deesha International Eye Bank (Branch: Yavatmal)

  • anildeshmukh
  • 7 days ago
  • 2 min read

स्व. श्रीमती विद्या प्रकाश पातुरकर यांचे

दिशा इंटरनॅशनल आय बँक (शाखा : यवतमाळ) मध्ये नेत्रदान


समर्थवाडी, यवतमाळ येशील रहिवासी स्व. श्रीमती विद्या प्रकाश पातुरकर यांचे दुःखद निधन झाले. पातुरकर परिवारावर दुःखाचे डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत श्री. प्रकाश पातुरकर यांनी आपली पत्नी स्व. श्रीमती विद्या प्रकाश पातुरकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, यवतमाळ व दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक, (शाखा : यवतमाळ) या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे मेडिकल डिरेक्त्तर डॉ. आशिष पोटफोडे, डॉ. विजय कावलकर, श्री. विशाल विर, यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


Paturkar Family donated the eyes of Late Vidhya Prakash Paturkar in Deesha International Eye Bank (Branch: Yavatmal)
Paturkar Family donated the eyes of Late Vidhya Prakash Paturkar in Deesha International Eye Bank (Branch: Yavatmal)

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे पातुरकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. पातुरकर परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात पातुरकर परिवारातील सौ. मनिषा जगताप, सौ. रजनी शिर्के, सौ. वैष्णवी जगताप व इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्रीमती विद्या प्रकाश पातुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Late Vidya Paturkar
Late Vidya Paturkar

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.


नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145

Comments


bottom of page