top of page

Serving Vision with Compassion Eye Checkup Camp at Karanja Lad by Deesha Group on Bhagwan Mahaveer Jayanti

दिशा ग्रुपच्या फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे कारंजा लाड येथे ११५ नागरिकांची नेत्र तपासणी


दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक यांच्या वतीने ग्रामीण व दुर्गम भागात फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे कारंजालाड, जिल्हा वाशीम येथे दिनांक २९ मार्च २०२६ रोजी भगवान महावीर जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.


Inauguration of the Eye Checkup Camp at Karanja Lad
Inauguration of the Eye Checkup Camp at Karanja Lad

या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण ११५ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदू व टेरेजियम हे आजार आढळून आले. संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी स्थानिक धर्मादाय नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे


या शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. भारतामध्ये अंधत्व ही एक गंभीर समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, याबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच चष्मा वापरणाऱ्या आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही नेत्रदानासाठी योग्य असतात.


यावेळी नेत्रदाते कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर नेत्रदान करून समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या या कुटुंबियांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या प्रेरणादायी निर्णयामुळे अनेक अंध व्यक्तींना नवी दृष्टी मिळू शकते, असा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

या शिबिरात दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Patients being screened for better eye health
Patients being screened for better eye health

नियमित नेत्र तपासणीमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक आजारांचे वेळेवर निदान होऊ शकते. योग्य वेळी निदान व उपचार मिळाल्यास अनेक रुग्णांची दृष्टी जाण्यापासून वाचवता येते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक ग्रामीण व दुर्गम भागात फिरते नेत्र चिकित्सालय सेवा उपलब्ध करून देत आहेत.



Comments


bottom of page