top of page

Two eye donations in one day at Deesha International Eye Bank, Amravati

anildeshmukh
Oct 23
2 min read

एका दिवसात दोन नेत्रदान स्व. श्री. अरुण नत्थू भालेराव व

स्व. श्री. वसंत शामरावजी बडासे यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक, अमरावती मध्ये नेत्रदान


Late Arun Bhalerao
Late Arun Bhalerao

मु. रामगाव, अमरावती व अनुरेश नगर, अमरावती येशील रहिवासी स्व. श्री. अरुण नत्थू भालेराव व स्व. श्री. वसंत शामरावजी बडासे यांचे दुःखद निधन झाले. दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत श्रीमती देवकन्या भालेराव यांनी आपले पती स्व. श्री. अरुण नत्थू भालेराव व बडासे परीवारातील मुलगा श्री. अनंता बडासे यांनी आपले वडील स्व. श्री. वसंत शामरावजी बडासे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. व दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे भालेराव व बडासे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. भालेराव व बडासे परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात भालेराव परिवारातील श्री. पांढुरंग भालेराव व श्री. संजय भालेराव तसेच बडासे परिवारातील श्री. विशाल बडासे व श्री. वैभव बडासे तसेच दोन्ही परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. अरुण नत्थू भालेराव व स्व. श्री. वसंत शामरावजी बडासे यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Late Vasant Badase
Late Vasant Badase

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.


मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.

नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145


Bhalerao Family donated the eyes of Late Arun Natthu Bhalerao in Deesha International Eye Bank, Amravati
Bhalerao Family donated the eyes of Late Arun Natthu Bhalerao in Deesha International Eye Bank, Amravati

Deesha International Eye Bank felicitated Badase Family for Eye Donation.
Deesha International Eye Bank felicitated Badase Family for Eye Donation.

Comments


bottom of page