A Legacy of Compassion: Eye Donation of Late Rajendra Dharshi Lodhaya in Deesha International Eye Bank, Amravati
स्व. श्री. राजेंद्र धारशी लोडाया
यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान
कांचन विहार कॉलनी, कारंजा (लाड), जिल्हा वाशीम येशील रहिवासी स्व. श्री. राजेंद्र धारशी लोडाया यांचे दुःखद निधन झाले. लोडाया परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले, परंतु अशाही परिस्थितीत मुलगा श्री. जिग्नेश लोडाया यांनी आपले वडील स्व. श्री. राजेंद्र धारशी लोडाया यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीने मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या संचालक मंडळाद्वारे लोडाया कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले. लोडाया परीवाराला नेत्रदान केल्याबद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात लोडाया परिवारातील मुलगा श्री. जिग्नेश लोडाया, श्री. जिनन लोडाया, डॉ. उल्हास काटोले तसेच लोडाया परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्री. राजेंद्र धारशी लोडाया यांना श्रद्धांजली अर्पण केली
भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 9899898667 | 7378656145




Comments