AMC School Screening Camp- A Step Toward Safeguarding Students' Vision Led by The DEESHA Mobile Eye Care Unit.
- Pranali Chambhare
- Apr 11
- 1 min read
दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालय द्वारा म.न.पा उर्दू शाळा वलगाव रोड अमरावती, मध्ये एकूण १६६ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावतीच्या फिरत्या नेत्र चिकित्सालयाच्या माध्यमातून म.न.पा. उर्दू शाळा वलगावं रोड अमरावती येथे दि. ९ एप्रिल २०२५ रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण १६६ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना योग्य चष्मा नंबर दिला गेला तसेच डोळ्यांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
यासोबतच, नेत्रदानाच्या महत्त्वाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी नेत्रदानासंबंधीच्या गैरसमजांना दूर करत “एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन जणांना दृष्टी मिळू शकते” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते, तसेच चष्मा लावणाऱ्या व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही दान होऊ शकतात.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती. शहनाज परवीन मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आणि अन्य कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
भारतासमोर अंधत्व ही मोठी समस्या असून, या समस्येच्या निर्मूलनासाठी दिशा ग्रुप सातत्याने कार्यरत आहे.
Comments