Celebrating Women’s Day by Bringing Eye Check-Ups to Every Woman: Deesha Mobile Eye Care Unit at Karanja Lad
दिशा ग्रुपच्या फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे कारंजा लाड येथे १२५ महिलांची नेत्र तपासणी

दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण व दुर्गम भागात फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे वाशीम जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त, दि. ८ मार्च २०२६ रोजी कारंजा लाड येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये महिलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. एकूण १२५ महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांमध्ये व महिला मध्ये मोतीबिंदू व टेरेजियम (Pterygium) हे आजार आढळून आले. संबंधित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. भारतात अंधत्व ही गंभीर समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ही महत्त्वाची माहिती नागरिकांना देण्यात आली.
विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच चष्मा वापरणाऱ्या व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही दान करता येतात, याबाबतही जनजागृती करण्यात आली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दिगंबर जैन महिला महासमिती तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्रचिकित्सक प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नियमित नेत्र तपासणीमुळे नेत्रसंबंधित आजारांचे वेळेवर निदान होऊ शकते. योग्य वेळी उपचार मिळाल्यास अनेक रुग्णांना दृष्टी गमावण्यापासून वाचवता येते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक ग्रामीण व दुर्गम भागात फिरत्या नेत्र चिकित्सालयाची सेवा उपलब्ध करून देत आहेत.




Comments