top of page

A Steps Towards Better vision: Eye Checkup Camp at AMC School by Deesha Group

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालय द्वारा म.न.पा. उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.२ अलीम नगर मध्ये एकूण १८६ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी


Students Receiving Eye Care Services at Eye Checkup Camp AMC School
Students Receiving Eye Care Services at Eye Checkup Camp AMC School

दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती संचालित फिरते नेत्र चिकित्सालय यांच्यातर्फे अलीम नगर अमरावती येथील म.न.पा. उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.२ मध्ये दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण १८६ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना योग्य दृष्टी परीक्षण करून आवश्यकतेनुसार चष्म्याचे नंबर दिले गेले. डोळ्यांचे आरोग्य कसे जपावे, योग्य देखभाल कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, काही विद्यार्थ्यांमध्ये पुढील उपचारांची आवश्यकता आढळल्याने त्यांना स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

Students Undergoing Eye Screening
Students Undergoing Eye Screening

 

या शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगितले. भारतात अंधत्व ही मोठी समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच चष्मा वापरणाऱ्या आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही दान करता येतात. या शिबिरातून विद्यार्थ्यांना नेत्रदानाचे सामाजिक महत्त्व समजले आणि भविष्यात समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.

 

शिबिराच्या अध्यक्षस्थानी म.न.पा. उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.२ अलीम नगर येथील मुख्याध्यपिका श्रीमती नाजिया तब्तसुम मॅडम उपस्थित होत्या तसेच, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.

 

समाजात नेत्र आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य नेत्रसेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Comments


bottom of page