top of page

“Deesha Group’s Eye Care Initiative: A Step Towards Better Vision for AMC School student’s

  • anildeshmukh
  • Mar 29, 2025
  • 1 min read

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकित्सालय द्वारा म.न.पा उर्दू उच्च प्रा. शाळा क्र. ३ अमरावती, मध्ये एकूण ९५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी


दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती संचालित फिरते नेत्र चिकित्सालय यांच्यातर्फे गवळीपुरा, अमरावती येथील म.न.पा. उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.३ मध्ये दिनांक २६ मार्च २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण ९५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Eye Checkup Camp AMC School No. 03 Gawalipura Amravati
Eye Checkup Camp AMC School No. 03 Gawalipura Amravati

या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना योग्य दृष्टी परीक्षण करून आवश्यकतेनुसार चष्म्याचे नंबर दिले गेले. डोळ्यांचे आरोग्य कसे जपावे, योग्य देखभाल कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, काही विद्यार्थ्यांमध्ये पुढील उपचारांची आवश्यकता आढळल्याने त्यांना स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.


या शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजांना दूर करण्याचे काम केले. भारतात अंधत्व ही मोठी समस्या असून, एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच, चष्मा वापरणाऱ्या आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींचे डोळेही दान करता येतात.



उल्लेखनीय उपस्थिती व योगदान

शिबिराच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. वाहिद खान पठाण उपस्थित होते. तसेच, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.


समाजात नेत्र आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना योग्य नेत्रसेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

Comments


bottom of page