Early Detection, Better Vision: Highlights from Deesha Group’s AMC School Eye Checkup Camp
दिशा ग्रुपच्या फिरत्या नेत्र चिकित्सालयाद्वारे म.न.पा. शाळा क्रं. ७ व शाळा क्रं. १७, विलास नगर, अमरावती येथे २०३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती संचालित फिरते नेत्र चिकित्सालय अंतर्गत दि. १२ मार्च २०२५ रोजी विलास नगर अमरावती येथील म.न.पा. उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्रं. ७ व म.न.पा उच्च प्राथ मराठी शाळा क्रं. १७, या दोन शाळेत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २०३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य तपासून, आवश्यकतेनुसार चष्म्याचा योग्य नंबर देण्यात आला. तसेच डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठवण्याची शिफारस करण्यात आली.
शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगत, समाजातील गैरसमज दूर करण्याचे कार्य केले. भारतात अंधत्व ही एक मोठी समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना प्रकाश मिळू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असलेल्या व्यक्तींना देखील नेत्रदान करता येते. तसेच चष्मा लावणाऱ्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान देखील शक्य आहे.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी म.न.पा. उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्र. ७ च्या मुखध्यापिका कु. निलिमा शिंगाडे मॅडम व म.न.पा उच्च प्राथ मराठी शाळा क्र. १७, च्या मुख्याध्यापिका कु. प्रतिभा कोलवते मॅडम व शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आणि अन्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. दिशा ग्रुपच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे डोळ्यांचे आरोग्य तपासण्यासह, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडून आले.




Comments