Jinturkar Family donated the eyes of Late Vina Devidas Jinturkar in Deesha International Eye Bank, Amravati
- anildeshmukh
- Jun 12
- 2 min read
दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये
स्व. श्रीमती विणा देवीदास जिंतूरकर यांचे नेत्रदान
अंजनगाव सुर्जी, अमरावती येशील रहिवासी स्व. श्रीमती विणा देवीदास जिंतूरकर यांचे दुःखद निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. जिंतूरकर परिवारावर सुद्धा दुःखाचा डोगर कोसळले, परंतु अशाही परिस्तितीत जिंतूरकर परिवाराने स्व. श्रीमती विणा देवीदास जिंतूरकर यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ अंकित हरवानी, श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली

नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे द्वारे जिंतूरकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. जिंतूरकर परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या सेवाभावी कार्यात जिंतूरकर परिवारातील श्री. अनिल जिंतूरकर, श्री. अजय संघई, श्री. विशाल भेलांडे तसेच परिवारातील इतर सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्व. श्रीमती विणा देवीदास जिंतूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतामध्ये कॉर्नियल अंधत्व ही गंभीर समस्या बनत चालली आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, चष्मा असणे किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत नेत्रदान केले जाऊ शकते.
मृत्यूनंतर तात्काळ डोळे बंद करून त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावेत, डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात आणि पंखा बंद ठेवावा. ए.सी. सुरू ठेवला तरी चालतो. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा.
नेत्रदानासाठी संपर्क: 7378656145। 7378656144 । 9899898667




Comments