top of page

Deesha Mobile Eye Care Unit in collaboration with AMC, brought eye checkup camps that empower women and families through vision care.

दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय द्वारा व “स्वस्थ नारी, सशक्त परिवार”

या अभियान अंतर्गत ४६७ गरजुंची नेत्र तपासणी करण्यात आली.


राज्यात १७ सप्टेंबर ते ०२ ओक्टोम्बर या कालावधीमध्ये “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारा संचालित फिरते नेत्र चिकित्सालय रोज अमरावती महानगरपालिकेच्या विवीध शहरी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नेत्र तपासणी करत आहे.

Eye Checkup Camp
AMC Eye Checkup Camp

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर २०२५ पासून ते ०२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ९२६ गरजूंची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. या नेत्रतपासणी मध्ये चष्म्याचे योग्य नंबर काढून देण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोतीबिंदू असलेले १४२ रुग्ण आढळून आले, त्याच प्रमाणे टेरेजिअमचे १३ रुग्ण आढळले व त्याचबरोबर आपण आपल्या डोळ्याची कश्या प्रकारे काळजी घेऊ शकतो यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालय मध्ये पाठवण्यात येणार आहे. दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नागरिकांना नेत्रदानाची माहिती देऊन त्याबद्दलचे गैर समज दूर केले.


“स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे अभियान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे व या अभियानाचे लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत कशे पोहचावे यावर दिशा ग्रुपच्या फिरते नेत्र चिकिसालय यांनी कार्य केले. तसेच या शिबिरामध्ये सर्व शहरी आरोग्य केंद्रामधील कर्मचारी यांचे योगदान आहे. तसेच दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते.

नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५, ७३७८६५६१४४, ९८९९८९८६६७

Comments


bottom of page